महिला छात्रांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध   

माजी लष्करप्रमुखांचा विश्वास; एनडीएतील मुलींच्या प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेमध्ये छात्रांना दिल्या जाणार्‍या प्रशिक्षणामध्ये प्रथमच १७ मुलींनीही आपली क्षमता सिद्ध् केली आहे. हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या मुलींच्या भविष्यातील प्रगतीसाठी सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्या नक्कीच देशाचा नावलौकीक उंचावतील, असा विश्वास माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी व्यक्त केला. एनडीएमध्ये महिला छात्रांसाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आण शैक्षणिक गुणवत्तेबद्दलही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना समाधान व्यक्त केले.
 
व्ही. के. सिंग म्हणाले, यंदाच्या १४८व्या तुकडीने सर्वात्तम संचलन सादर केले. माझेही सशस्त्र दलातील प्रशिक्षण याच अकडमीमध्ये झाले आहे. याठिकाणी दीक्षांत संचलनासाठी मी दुसर्‍यांदा येत आहे. अ‍ॅकॅडमीतील अनेक अनेक गोष्टी बदललेल्या नाहीत, तरीही खूप काही परिवर्तन याठिकाणी घडत आहे. प्रशिक्षण पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर, आधुनिकीकरण या गोष्टी होतच राहणार आहेत. मात्र, या संस्थेचा पाया भक्कम आहे. याठिकाणी मुलींचा सहभाग ही अ‍ॅकॅडमीसाठी ऐतिहासिक बाब आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या भविष्यातील विकासासाठी सर्व पायाभूत सुविधा तत्पर आहेत. दुसर्‍या महायुद्धासह जम्मू-काश्मीरमध्ये शहिद झालेल्यांसाठी एनडीएमध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. याठिकाणी संचलनानंतर जनरल व्ही. के. सिंग यांनी भेट देऊन शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पुष्पचक्र अर्पण केले.
 
नारीशक्तीचा सहभाग उज्ज्वल भविष्यासाठी 
 
• संचलनानंतर छात्रांना मार्गदर्शन करताना लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग म्हणाले, लष्करी प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या अनेक पिढया याठिकाणी घडल्या आहेत. त्यांनी देशाच्या सेवेमध्ये आपले त्याग, शौर्य, सन्मान उंचावला आहे. त्यामुळेच आपले संरक्षण दल हे जगातील सर्वोत्तम लष्करी दल ठरले आहे. महिला छात्रांनी या प्रशिक्षणामध्ये यंदा प्रथमच सहभाग घेतला. ही नारीशक्तीच्या उज्जवल भविष्याची सुरूवात ठरेल. छात्रांसह त्यांच्या पालकांनी दाखविलेला त्याग, छात्रांची सेवा देशासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

Related Articles